Top News

पैशाच्या वादावरून एकाला मारहाण व धमकी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जुन्या पैशाच्या वादावरून चार व्यक्तीने वणीत येऊन एका चायनीजचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला धक्काबुक्की करून मारहाण केली. ही घटना गुरुवार दि. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता च्या सुमारास घडली असून याप्रकरणी चौघाविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  
आरोपी सारंग संजय साठोणे (34) रा.सिनर्जी वर्ल्ड कोसारा, जि.चंद्रपूर यासह आणखी तिघांचा समावेश आहे. वणी येथील संतोष रुपेश लोहकरे (32) रा. तेलीफैल, वणी यांचे साई मंदिर चौकात स्टेट बँके जवळ चायनीजचा व्यवसाय करतात. या ठिकाणी नमूद आरोपीनी येऊन शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फोन करून त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली आहे. 
फिर्यादी च्या जबानी वरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 118 (1), 115(2), 351(4),352,351(2) (3), 3(5) BNS प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करत आहे.
Previous Post Next Post