सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कोलेऱा (पिंपरी) गावात पाणी शिरले असून सात ते आठ घरे बाधित झाली आहे. वे को ली. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गावकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
मागील चार पाच दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहेत. गावाजवळून जाणारा नैसर्गिक नाला वे.कॊ.लि.ने बंद केला आहे. गावाशेजारीच वे.कॊ.लि. ने मातीची मोठी डंपिंग उभी केली. त्यामुळे शेतशिवरातील,गावातील आणि वे. कॊ.लि.ने नाल्याची दिशा बदलविल्याने संपूर्ण पाणी गावाजवळ जमा झाले आहे. परिणामी काहींच्या घरात तर दोन ते फूट पाणी साचले असून जीवनाश्यक वस्तू पाण्याखाली आल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आणि गावशिवारातील दूषित पाणी गावात मोठ्या प्रमाणात साचल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे वे.को.लि. प्रशासन असल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला. शिवाय स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने ह्या बाबीला सामोरे जावे लागत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना माहिती मिळतात त्यांनी कोलेरा गावाला भेट देऊन पाहणी केली आणि सब एरिया मॅनेजर यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना सर्वस्वी मदत करा,अन्यथा आपल्या कार्यालयासमोर गावकऱ्यांना घेऊन ठिय्या मांडू असा इशारा दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.