सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : संस्कार भारती समिती व सागर झेप संस्थेतर्फे गुरुपूजन व नटराज पूजन सोहळ्यानिमित्त भक्ती गीतांवर आधारित विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.13 जुलै 2025 ला सकाळी 11 वाजता गणेशपूर येथील श्री विनायक मंगल कार्यालय, वणी या ठिकाणी गुरुपूजन व नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये कलावंताचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये एकल नृत्य अ गट 5 ते 14 आणि समूह नृत्य ब गट 5 ते 60 वय असे असणार आहे. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.