सलून व्यावसायिकाच्या मुलीची उंच भरारी...


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : नाभिक समाजाच भूषण पुनम ताई नागपुरे यांचे आज राष्ट्रीय जनसेवा पक्षा द्वारे यवतमाळ जिल्ह्यातील तमाम नाभिक समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
एमपीएससी परीक्षा मेरीट मधे उत्तीर्ण होऊन पशु वैद्यकीय विकास अधिकारी म्हणून शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल,त्यांच्या स्थानिक कार्यालय बोटोनी येथे पुनम ताईचे स्वागत करताना समजाच्या वतीने त्यांना आज पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
त्यांच्या महान यशाचं कौतुक करताना सर्व समाज बांधवांनी त्यांना पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले.
या वेळी यवतमाळकर नाभिक बांधवांनी पुनम ताईंच्या यशाचे मनभरून कौतुक केले आणि पुढील यशस्वी वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.
या अभिनंदनाचा कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे मान्यवर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मांडवकर,बंडु येयेकर, पत्रकार रविकिरण घुमे, पत्रकारआनंद नक्षणे,राजु घुमे,मनोज घुमे,राजु चौधरी,अजय धांडे,भारती ताई मांडवकर,अर्चना ताई येसेकर,रजनी ताई मांडवकर,
आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post