चेतन पवार : सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कक्षात शाळा भरविण्यात आली होती.यामुळे शिक्षण विभागात सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता.
तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 1 ते 7 वर्ग असून,एकूण विद्यार्थी पटसंख्या 152 आहे.या शाळेत केवळ 2 शिक्षक कार्यरत असून,2 शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहे. हे सर्व चारही शिक्षक वेळेवर शाळेत हजर राहत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यासंदर्भात पूर्व सूचना दिल्यानंतरही शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही.
यामुळे अखेर आज ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कक्षात विद्यार्थ्याची शाळा भरविण्यात आली.यामुळे सर्वत्र एकच गोंधळ निर्माण झाला होता.या बाबत अनुपस्थित शिक्षकांची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.तसेच शिक्षकांची अपूर्ण पदे लवकर भरण्यात येतील,असे गटशिक्षण अधिकाऱ्याने लेखी आश्वासन दिले आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे ने दिला आहे.
यावेळेस मनसेचे ईश्वर राठोड, रणजित झोंबाडे, विशाल चव्हाण, गौरव जावरे,अमोल राजपल्लू व माजी ग्रा पं सदस्य संदिप गडलिंग, धिरज राठोड, लक्ष्मण जाधव, दिपक चव्हाण, सुदाम जाधव, आदी सह ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.