सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : मारेगाव तालुक्यातील युवकांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला.
यावेळी काँग्रेस नेते माननीय वामनराव कासावार, डॅनी सेंड्रावर, डॉ.महेंद्र लोढा, ओम ठाकूर, इजहार शेख, व महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी व ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी महिला वर्ग आदी उपस्थित होते.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये धनंजय आसुटकर, प्रफुल मानकर,
अनिकेत काटकर, तेजस वाघमारे, सुमेध तोतडे, पवन सातपुते, आशिष पाटील, नितीन तुरणकर, राजू मेसेकर
शुभम मेश्राम, भुपेंद्र खुलसंगे आदी अनेक युवकांनी प्रवेश केला आहे.
आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत होऊ घातल्या असतांना धनंजय आसुटकर नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तळागाळातील लोकांशी जुळलेली काँग्रेसची नाळ ती कायम ठेवण्याकरिता व लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाला समर्थन देणे हे कधीही चांगले, तेव्हाच आपली लोकशाही मजबूत राहील असे या प्रसंगी त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना आसुटकर यांनी सांगितले.