सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (६ जुलै) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजूर विभाग प्रमुख प्रदिप शामराव बांदूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांच्याकडे प्रदीप बांदूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपविला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते मनसेचे सक्रिय कार्यकर्ते होते. मनसेच्या माध्यमातून अनेक चळवळी त्यांनी राबविल्या आहे. जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्याला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते तालुक्यात ओळखले जायचे. त्यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. प्रदीप बांदूरकर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. एकेकाळी त्यांच्याच सोबत कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याने त्याच वार्डातून त्यांच्या विरोधात निवडणूक लवढविल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत होती. त्यांच्या राजीनामा देण्यामागे ही खद तर नाही ना, ही चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रदीप बांदूरकर यांनी मनसेतून माघार घेतल्या नंतर ते आता कोणत्या पक्षात जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदीप बांदूरकर यांनी घेतली मनसेतून माघार, राजूर विभाग प्रमुख पदाचा दिला राजीनामा
Sahyadri chaufer