टॉप बातम्या

वाढत्या विजबिलाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने तहसीलदार यांना कंदील भेट आंदोलन

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
केळापूर, (६ जुलै) : महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या सरकार सत्तेवर आली वीज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्यात नारा देऊन सत्तेमध्ये आली.परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वाढत्या वीज बिल बाबत, वीज बिल आकारणी संदर्भांमध्ये, वीज बिल मोफत देण्याचा संदर्भांमध्ये, लोडशेडिंग संदर्भामध्ये कोणते ही सरकार आज पर्यत महाराष्ट्र मध्ये बोलताना दिसत नाही. या उलट महाराष्ट्र मध्ये काँगेस भाजपा आणि आता महाविकास आघाडी चे सरकार बनले आहे.त्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची मोठया प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारून लूट केली आहे. आणि करत आहेत. यामध्ये शेतकरी, घरगुती वीज कनेक्शन, व्यापारी या सर्वांची लूट सत्तेवर आलेल्या वेगवेगळी सरकार करत आहेत. वीज बनवण्यासाठी प्रतीयुनिट ६३ पैसे खर्च येतो. वीण बनवता असताना जी वीज गळती होते ते प्रति युनिट ३३ पैसे इतकी असते. नफा व इतर गोष्टी पकडून ही वीज ग्राहकाला साधारण १.९३ पैसे प्रतीयुनिट ने दिली पाहिजे यामध्ये मीटर भाडे सहभागी केल्यास ही रक्कम जवळजवळ २.९३ रुपये प्रतीयुनिट होते. परंतु चारझेस मार्फत १०० युनिट पर्यतचे ५.३४ पैसे प्रति युनिट घेतले जातात ३०० ते ५०० युनिट पर्यत ९.८२ पैसे प्रति युनिट आकारणे जातात.५००ते१०००पर्यत १०रु प्रति युनिट १०रु. प्रति युनिट च्या दरम्यात पैसे घेतले जातात १००० युनिटच्या पुढे दहा रुपये प्रतीयुनिट घेतले जातात.वीज शुल्क शासन अधिसूचना कायदा दि.२१/१०/२०१६ रोजी युती सरकारमध्ये पास झाला आहे.अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने आधिभार रद्द केला पाहिजे.मीटर रीडिंग ३०दिवसाच्या आत मध्ये घेणे गरजेचे आहे. ३०दिवसा पेक्षा जास्त अंतर ठेवल्यास युनिट १००च्या पुढे गेल्यामुळे अतिरिक्त अधिभार आकारला जातो.एकीकडे जनता लोकडाऊन व कोरोना च्या महाभयंकर परस्थितीमुळे संकटात सापडली आहे. दुसरी कडे महागाई गगनाला भिडली आहे. तरी विज बिल माफ करण्यात यावे या करिता दिनांक ०६जुलै २०२१ आज रोजी तहसील कार्यालय केळापूर (पांढरकवडा) कंदील भेट आंदोलन करुन आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या करण्यात आले 
१) २०० युनिट पर्यत चे वीज बिल माफ करण्यात यावे
 २) मीटर भाडे कपात करण्यात यावे
३)विजेचा स्थिर आकार वर प्राथमिक भाव प्रमाण दर आकारणी करावी
४)सक्ती ची वीज बिल वसुली तत्काळ थांबवावी
 ५) ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्याचे साठी अभय योजना तयार करावी ,व पुढील वर्षभरात वीज बिल निल पाठवावे.
आणि 
६)३० दिवसानंतर रिडिंग घेणाऱ्या व्यक्ती वर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी सर्व पदाधिकारी उपस्थित होते कंदील भेट आंदोलनाचे नेतृत्व मा.ऍड.अनिल किनाके साहेब बहुजन मुक्ती पार्टी श सचिव महाराष्ट्र.ब.मु.प.तालुकाध्यक्ष भीमराव कोरवते, शिंपला गेडाम महिला युवा मोर्चा, सुनील मोगुर्ले राष्टीय किसान मोर्चा रुचिताई गवकारे, आशिष मडावी, राहुल मेश्राम, प्रशांत भाऊ मुनेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post