सह्याद्री न्यूज नेटवर्क |
अमरावती, (१२ जुलै) : जुने आणि कडवट शिवसैनिक, बाळासाहेब आणि आता उद्धव साहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ असे सुधीर सूर्यवंशी अमरावती, अशोक शिंदे वर्धा, अजय स्वामी चंद्रपूर, बाळू मुंगीलवार यवतमाळ, श्रीरंग पिंजरकर अकोला, प्रतापराव जाधव बुलढाणा, मुकेश शिवअरे गोंदिया, यांना शिवसेने कडूनमहामंडळ मिळण्याची दाट शक्यता गुप्त माहिती नुसार वर्तविण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष असून, प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना पक्षवाढ करण्यासाठी नवनवीन जबाबदारी देत आहेत. त्यामध्ये शिवसेना सुद्धा मागे नाही. शिवसेनेने सुद्धा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महामंडळ देण्याचे ठरवले आहे.
आता हे पाहावे लागेल की या महामंडळाला राज्यपाल नियुक्त आमदार सारखा वेळ लागेल की लवकर महामंडळ मिळून कार्यकर्ते कामास लागणार आहे.
शिवसेनेकडून जुन्या शिवसैनिकांची विदर्भात महामंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 12, 2021
Rating:
