कविता
"आरक्षणाने पुढे गेला समाज बाबा"
जगाचा विश्वास आहे बाबा
बहुजनांचा श्वास आहे बाबा
लेकरांचा घे निळा सलाम बाबा..
प्रबुद्ध भारताची आज शान बाबा
लोकशाहीचा आहे प्रान बाबा..
तुच आन बान शान इमान बाबा
भिम सैनिकांचे जयगान बाबा..
धम्मकाया पाऊलांचा तुच बाबा
गगणात मावेना आनंन्द बाबा..
प्राणाहुनि प्यारे तुझे नाम बाबा
जयभीम म्हणा राज्यासह बाबा..
तुझ्या कायद्याने हे राज बाबा
तुझे संविधान हा ताज बाबा..
आरक्षणाने पुढे गेला समाज बाबा
सुखी समाधान बहुतांश आज बाबा..
अन्तरात मंगल मैत्री आहे बाबा
सुप्रभात रान उठवी आज बाबा..
तुझ्याच शब्दावर कुर्बान बाबा
पक्षी प्राणी गौतम अवती भवती बाबा..
-गौतम धोटे
कवी-पत्रकार, 9637708593