योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : मौजा येडशी भागात कोसळधार पाणी पडल्याने येथील रपटा (पुल) हा पाण्याखाली जावून जे-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व सभोवतालच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
थोडा जरी पाणी आला की, येडशी ते मुकुटबन संपर्क तुटतो? या रपटा (पुल) चे काहीतरी करा यासाठी वेळोवेळी कागदोपत्री व्यवहार करून सुद्धा संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. येडशी ते मुकुटबन हा प्रवास 6 कि.मी अंतराचा असून कित्येक प्रवाशी ऑटो च्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र,या पुलावरून पाणी वाहू लागलं की, वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. अर्जंट कामे थांबून जातात.
गेली वीस ते पंचवीस वर्षा पूर्वी हा रपटा (पुल) 3/4 फुटाचा बांधण्यात आला. मात्र उंचीला टिल्लू असल्यामुळे नागरिकांना येडशी वरून मुकुटबन व अन्य गावी जाण्यास खूप मोठी कसरत करावी लागते. तसेच आजूबाजूच्या परिसरात येडशी येथील शेतकऱ्यांची शेतीबाडी आहे. शेतीचा हंगाम सुरु कामे सुरू असल्याने मुकुटबनहून मजुरांना येडशी येथे यावं जावं लागतं. मात्र पाऊस आला की, ह्या टिल्लू पुल लगेचच भरून वाहतो. त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करून जावे लागते.
या सतत होणाऱ्या पावसाने आजही या मार्गावर कित्येक नागरिक ताटकडत उभे आहे. मोटारसायकल पासून ते थ्री व्हीलर, चारचाकी पर्यंत वाहन अडकून पडतात. त्यामुळे येडशी वरून मुकुटबन व्हाया मुकुटबन वरून येडशी जायचं कसे? हा नागरिकांना प्रश्न पडतो. पुलाची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा अंदाजा लावता येत नाही. अशातच एखादा पेशंट जर बिमार पडला तर सुखरूप घेवून जाता येत नाही. पाण्यामुळे पुलावरून वाहन जात नाही त्यामुळे येडशी वाशियांचा सतत संपर्क तुटतो. या गंभीर बाबीकडे या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार व बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन हा उंच बांधण्यात यावा, अशी मागणी येडशी ग्रामस्थ करीत आहे.

