सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या चंद्रपूर क्षेत्रातील भटाडी ओपनकास्ट माईन येथे खान सुरक्षा महानिदेशालय, नागपूर क्षेत्र यांच्या तत्त्वावधानात आयोजित करण्यात आला होता. या वार्षिक खान सुरक्षा पखवाडा २०२६ निमित्त काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी उपस्थिती लावत खाण कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी खाणकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, कामाच्या ठिकाणी घ्यावयाची दक्षता आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. खाण क्षेत्रातील प्रत्येक कामगाराची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी असून, अपघातमुक्त कामकाजासाठी प्रत्येकाने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ‘शून्य क्षती’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सजगतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन संजय खाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने खाण कामगार उपस्थित होते.

