अभिष्टचिंतन ✨
विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात करून प्रवीण खानझोडे यांनी राजकीय चळवळीतही पाऊल टाकले. मात्र त्यांचा खरा ओढा समाजकारणाकडे आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामाजिक प्रश्नांचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आदर्शावर ते चालतात. ते आज शोषित, वंचित, ओबीसी आणि बारा बलुतेदारांच्या चळवळीत सातत्याने कार्यरत आहेत.
ओबीसी समाजात जनजागृती
ओबीसी समाजात हक्कांविषयी जनजागृतीची नितांत गरज आहे. या जाणिवेतून त्यांनी ओबीसी परिषदेचे गठन केले आणि त्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य सुरू केले.
बारा बलुतेदार संघटना - हक्काचा लढा
बलुतेदार म्हणजे गावकामगार,पिढ्यानपिढ्या पारंपरिक काम करणारे हे 12 बलुतेदार आजही न्याय आणि हक्कासाठी झगडत आहेत.त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी प्रवीण खानझोडे बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील गावपातळीवर बलुतेदारांना संघटीत करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे.
व्यवसायाच्या क्षेत्रातही त्यांची वाटचाल तितकीच उल्लेखनीय आहे. करतानाही सामाजिक कार्याची जोड त्यांनी कायम ठेवली आहे म्हणून राजकारण समाजकारणात सक्रियता ही दुहेरी जबाबदारी ते यशस्वीपणे निभावत आहेत.
अन्यायाविरोधात 'लढा' सुरुच
राजकारणात सक्रिय असताना सामाजिक प्रश्नांवर स्वतंत्रपणे काम करताना अनेक मर्यादा येतात, याची जाणीव झाल्यानंतर प्रवीण खानझोडे यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेत 'लढा' या संघटनेची स्थापना केली.
आज या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठविला जात आहे. केवळ निवेदने देणे किंवा आंदोलनांपुरते संघटनेचे कार्य मर्यादित न ठेवता, गरज पडल्यास प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सध्या वणी शहरालगतच्या परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खानझोडे यांनी *प्रदूषणाचा पर्यावरण आरोग्यमुद्दा* प्राधान्याने हाती घेतला असून, नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वणी विधानसभेतील युवापिढीतील आश्वासक चेहरा
विद्यार्थी चळवळ, ओबीसी परिषद, बारा बलुतेदार संघटना, लढा संघटना आणि आरोग्य पर्यावरण प्रदूषणाविरुद्धचा "लढा" या सगळ्या कामांमुळे प्रवीण खानझोडे हे आज वणी विधानसभेतील युवापिढीतील आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जातात.
प्रवीणभाऊ खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
