टॉप बातम्या

४४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील मानकी येथील एका ४४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सतीघाट परिसरातील निर्गुडा नदीकाठावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे मानकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुर्यभान तुळशीराम काकडे असं गळफास घेतलेल्याचे नाव असून घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुर्यभानच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();