टॉप बातम्या

माथार्जुनच्या आरोग्य सुविधांना बळ; १.५० कोटींच्या दवाखान्याच्या कामाला सुरुवात!

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : तालुक्यातील माथार्जुन गावातील आरोग्य सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. गावात १ कोटी ५० लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या कामाला आज उद्घाटनानंतर प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. त्यामुळे उपचारासाठी दूरवर जाण्याची ग्रामस्थांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांना स्थानिक स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्यातून या दवाखान्यासाठी १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. आज कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

उद्घाटनप्रसंगी सरपंच निर्मलाताई कुमरे, उपसरपंच रवींद्र कायतवार, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच बाबुलाल किनाके, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील प्रकाश गेडाम, तंटामुक्ती अध्यक्ष नागोराव दांडजे, पेसा अध्यक्ष गजानन कोडापे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार योगेश मडावी, जलपत कुमरे, शंकर मेश्राम सर, रोजगार सेवक प्रविण किनाके, रामू मडावी, राजू टेकाम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

या विकासकामासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. दवाखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर माथार्जुनसह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();