टॉप बातम्या

दुर्घटना व संकट समयी धावून येणारे चंद्रपूर पोलीस आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

चंद्रपूर : खाकी वर्दी म्हटली की डोळ्यांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारे पोलीस उभे राहतात. मात्र, याच खाकी वर्दीमागे संवेदनशील मन आणि समाजाप्रती असलेली बांधिलकीही दडलेली असते, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने घडवून आणला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी समर्पित केले आहे. या उपक्रमातून तब्बल १८ लाख १४६ रुपयांचे योगदान देण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार दुष्काळ निवारणासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या वेतनातून एक दिवसाची रक्कम कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा प्रेरणादायी संदेश देणारा आहे. कर्तव्य बजावताना कठोर दिसणाऱ्या खाकी वर्दीतील माणुसकीचे हे दर्शन निश्चितच कौतुकास्पद असून, चंद्रपूर पोलीस दलाच्या या सामाजिक योगदानाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();