सह्याद्री चौफेर | किरण घाटे
चंद्रपूर : महाराष्ट्रातील परिचित सामाजिक कार्यकर्त्या तथा नागपूर येथील समाजसेविका आणि ‘सहज सुचलंच’च्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे या येत्या २२ नोव्हेंबर रोजी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यांच्या आगामी परदेश दौऱ्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. यापूर्वी त्यांनी आफ्रिका दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, श्रीलंकेचा हा त्यांचा चौथा परदेश दौरा असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रातील ‘सहज सुचलंच’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यालाही मायाताई कोसरे उपस्थित राहणार आहेत. या संदर्भातील माहिती संस्थेच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके यांनी भेटीदरम्यान दिली. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासोबतच या आगामी दौऱ्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष लागले आहे.