टॉप बातम्या

वणी विधानसभा क्षेत्रातील तीन तालुक्यांना ३ कोटी ६६ लाखांचा रस्ते विकास निधी!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी आमदार संजय देरकर यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, वणी, मारेगाव आणि झरी-जामणी या तीन तालुक्यांतील सहा महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकाम व सुधारणेसाठी एकूण ३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये वणी तालुक्यातील रासा गावाच्या हद्दीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामासह मारेगाव व झरी-जामणी तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या सुधारणेच्या कामांचा समावेश आहे.

वणी तालुक्याला ८७ लाखांचा निधी

वणी तालुक्यातील रासा गावाच्या हद्दीतील एमडीआर-७१ मार्गावर कि.मी. १५/९०० ते १६/३५० दरम्यान ४५० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून, या कामासाठी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे संबंधित मार्गावरील वाहतुकीला अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

मारेगाव तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी १ कोटी ५४ लाख

मारेगाव तालुक्यातील तीन रस्त्यांच्या सुधारणेसाठी एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये राज्य महामार्ग क्रमांक ०६ ते करनवाडी मार्ग (एमडीआर-६८) कि.मी. १९/१०० ते १९/७५० दरम्यानच्या रस्ता सुधारणेसाठी ३४ लाख रुपये, करनवाडी–नवरगाव–बोर्डा मार्ग (एमडीआर-६८) कि.मी. २२/६०० ते २४/००० दरम्यानच्या सुधारणेसाठी ७० लाख रुपये, तर नवरगाव–पेंढरी रस्ता (ग्रामा-१३६) कि.मी. ०/०० ते १/५०० या टप्प्यातील सुधारणेसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

झरी-जामणी तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी १ कोटी २५ लाख

झरी-जामणी तालुक्यातील झरी माथार्जून गारगोटी पोड (ग्रामा-५४) या एकूण १.५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बल्हासा ते जुनोनी (ग्रामा-८७) या एकूण २.८०० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या दोन्ही कामांसाठी एकूण १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण दळणवळणाच्या प्रश्नांना मिळणार दिलासा

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीच्या अडचणी आणि गावांना जोडणाऱ्या मार्गांचा प्रश्न लक्षात घेता या सहा कामांना मिळालेला निधी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभता येण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, वणी तालुक्यातील रासा येथील रस्त्याच्या कामासाठी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार संजय देरकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

तीन तालुक्यांतील सहा रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या या ३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीतून प्रत्यक्ष कामांना गती मिळून ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();