टॉप बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेच्या वणी विधानसभा सहअध्यक्षपदी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची नियुक्ती


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजना, वणी विधानसभा सहअध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार (माजी आमदार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील शेतकरी, गावपातळीवरील पायाभूत सुविधा तसेच शेतरस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बोदकुरवार यांचा प्रशासकीय अनुभव, जनसंपर्क आणि विकासाभिमुख भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();