टॉप बातम्या

मार्डा धरण परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता, पोलीस तपास सुरू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील वर्धा नदीवरील मार्डा धरण परिसरातील दांडगाव शिवारात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याचे सांगितले जात असून, मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दांडगाव येथील शेतकरी गौतम ठमके यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम सुरू होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालक शेताजवळील परिसरात गेला असता त्याला एका खोल खड्ड्याकडून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. संशय आल्याने त्याने पाहणी केली असता तेथे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसून आला. त्यानंतर ही माहिती शेतमालक गौतम ठमके यांना देण्यात आली.

घटनेची माहिती पोलिस पाटलामार्फत मारेगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) तसेच मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार शाम वानखेडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने संबंधित घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच मृतदेहावर लोखंडी रॉडसारख्या कठीण वस्तूने वार केल्याच्या खुणा दिसून आल्याने पोलिसांनी हत्येच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे. तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून, पोलिस विविध अंगांनी प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();