टॉप बातम्या

काँग्रेसला खिंडार; साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चर्चेत आलेले साहेबराव कांबळे यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुंबई उपमुख्यमंत्री निवासस्थानात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर साहेबराव कांबळे नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत जिल्हाभरात विविध चर्चा रंगल्या होत्या. आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी शिवसेनेची वाट निवडत आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केला.
उमरखेड-महागाव मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते व समर्थक शनिवारीच मुंबईत दाखल झाले होते. यात महागाव तालुक्यातील वरोडी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार मस्के, विजयभाऊ जाधव, सेवानगर विठ्ठल करे, धोडबाराव करे, प्रमोद पिटलेवाड, अशोक माटाळकर, करंजखेड यांचा समावेश होता.
आज रविवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी राजकीय घडामोडींवर या प्रवेशाचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();