टॉप बातम्या

घरकुल हप्ते रखडल्याने लाभार्थी अडचणीत; चौकशीसह आंदोलनाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील किंन्हाळा येथे शबरी आवास, प्रधानमंत्री आवास व मोदी आवास योजनांअंतर्गत मंजूर घरकुलांच्या रखडलेल्या हप्त्यांमुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक लाभार्थ्यांना पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळालेला नसल्याने घरबांधणीची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मारोती गौरकार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन थकीत हप्ते तातडीने वितरित करण्याची मागणी केली. अनेकांनी जुनी घरे पाडून कर्ज काढत बांधकाम सुरू केले असले तरी निधीअभावी त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
दरम्यान, गावातील एका अपूर्ण घराला कागदोपत्री पूर्ण दाखवून सर्व हप्ते वितरित करण्यात आल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत रखडलेले हप्ते वितरित न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

निवेदनावर मारोती गौरकार, मुकुंदा आडे, मनोज कडुकर, दामोदर कडुकर, श्रीराम घोडाम, रुखमाबाई उईके, जोती कटवते तसेच विठोबा बांदूरकर, विठ्ठल सिडाम, शामजी ढवकर, राजू मरस्कोल्हे, छगन भोयर, मारोती मडावी, दिलीप आडे, राजू आडे, प्रेमदास क्षीरसागर, महादेव मडावी, गुणवंत येरमे, शकुंतला उईके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();