सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : धनोजे कुणबी समाज बहूद्देशीय संस्था, मार्डीची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थेच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. यापूर्वी 18 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 24 मे रोजी मार्डी येथे मोहनभाऊ जोगी यांच्या प्रतिष्ठान मध्ये आयोजित बैठकीत सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षपदी मनीषा नागपुरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी पवन ढवस तर सचिवपदी विजय अवताडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव म्हणून विठ्ठल ठावरी, कोषाध्यक्ष म्हणून सुभाष पिंपळशेंडे यांची जबाबदारी सोपविण्यात आली.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून चंद्रशेखर आवारी, किशोर सूर, मोहन जोगी, सौ. अनिता गायधन, सौ.डीमन टोंगे, रामदास चिंचोलकर, धीरज हरबडे, गंगाधर ठावरी, शुभम भोयर, संतोष निब्रड आणि शंकर पोटे यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल समाज बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
