टॉप बातम्या

वारंवार वीजपुरवठा खंडित,नागरिक हैराण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मार्डी परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून, त्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. 

नागरिकांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कार्यालयाचा फोन कायम व्यस्त लागत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे परिसरातील जनता हैराण झाली आहे.

दररोज रात्री 9 ते 10 च्या दरम्यान वीज जाते आणि अनेकदा ती पहाटेपर्यंत येत नाही. सतत बंद होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, मार्डी परिसर हा आधीच अनेक समस्यांनी ग्रस्त असून राजकीय अनास्था स्पष्ट दिसून येत आहे. 

परिसरात 33 केवी क्षमतेचे वीज उपकेंद्र असले तरी त्यातून पुरवठा होणाऱ्या गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा थांबताथांबत नाही. यामुळे परिसरातील डिजिटल शिक्षण व उद्योग डबघाईत आले आहे.




Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();