सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
आता यवतमाळ येथून या पदयात्रेला प्रारंभ झाला असून यात्रेत राज्यभऱ्यातून शेतकरी, समर्थक तथा प्रहार चे यवतमाळ उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांच्यासह वणी तालुक्यातील जवळपास 30 ते 40 पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहे.
उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांच्या नेतृत्वात लाखखिंड (ता. दारव्हा) येथे 'मी शेतकरी' टोपी चे वाटप करण्यात आले. कालपासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ‘सात-बारा कोरा’ या पदयात्रा साठी रवाना होऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी ते पायदळ चालत आहे.