सह्याद्री चौफर | ऑनलाईन
यवतमाळ : 26 मे रोज सोमवार ला आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती चे अध्यक्ष माधव कोहळे यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे माध्यमातून मा.ना.श्री.देवेंद्र फडणविस,मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले.
मा.सर्वोच्च न्यायालयाचा सिविल अपिल क्र.4096/2020 चा अंतिम आदेश दि.18/12/2020 नुसार त्यात सांगितलेल्या अनुसुचित क्षेत्रातील व गोंड जमातीसोबत आप्तभाव दाखविणाऱ्या गोवारी जमातीला त्वरीत अनुसुचित जमातीचे गोंड गोवारी नावाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाली पाहीजे अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली.
नुकतेच राज्य शासनाने स्पेशल लिव पिटिशन क्र.16513/2023 अंतर्गत बबन लसुंते केस मध्ये मा.सुप्रिम कोर्टात एक काउंटर ॲफिडिविट सादर करुन आपली गोंड गोवारी जमाती बद्दल ची भुमिका स्पष्ट केली आहे.यात जे गोवारी लोक गोंड जमाती सारखी संस्कृती जपते ते गोंड गोवारी सवलती साठी पाञ असल्याचे नमुद आहे व त्याचे 1950 पुर्वीचे कागदोपञी पुरावे अथवा नोंद गोवारी असली पाहीजे.त्यामुळे आम्ही या सवलतीसाठी पाञअसुन आम्हाला आमचे संविधानीक अधिकार त्वरीत मिळावे या आशयाची मागणी निवेदनातुन यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केली.
यावेळी निवेदन देतांना जिल्हाधिकारी कार्यालय तथा निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी विश्राम गृह यवतमाळ येथे सर्वश्री दादाराव बोटरे,राजाभाऊ ठाकरे,सिताराम मंडलवार, चंद्रशेखर ठाकरे,जितेश राऊत,सतिश दुधकोहळे, कमलाकर नेवारे,सुभाष लसंते,धनराज खंडरे,महादेवराव नेवारे,राजेश नागोसे,संतोष बोटरे,प्रविण मोगरे,सचिन कोयरे,गोलू आडे,संतोष वाघाडे,भुषण ठाकरे,विजय नेवारे,राहुल नेवारे,अंचल भोयर,प्रशांत नेवारे इत्यादी अनेकजन हजर होते.
गोंड गोवारींना संविधानीक हक्क द्या'आरक्षण संरक्षण समितीची मुख्यमंञ्यांकडे मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2025
Rating: