मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील काही भागांमध्ये काल रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे अनेकजन घराबाहेर पडले, दरम्यान भितीचे सावट आहे. सोशल मीडिया आणि नागरिकांमध्येच याविषयी चर्चा सुरू झाली आहे. परंतु तालुका प्रशासनाने मात्र,अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तालुका प्रशासन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करीत आहे. 
मारेगाव तालुक्यांतील कुंभा, पिसगाव, चिंचाळा, मांगरूळ, सिंदी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे असल्यामुळे काहींना हलल्या सारखे झाले.निवांतपणे घरी झोपण्याचा तयारीत असलेले नागरिक घराबाहेर पडले. संपूर्ण घर हलल्यामुळे नागरिकांना मध्ये भीती निर्माण झाली आहे.
.याबाबत आता सोशल मिडिया वर भूकंपाच्या या सौम्य धक्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर ठीकठिकाणी अशा स्वरूपाचे धक्के जाणविल्याची चर्चा सुरू झाली आहे. या विषयी तालुका प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांना रात्री घरा बाहेर पडले. रात्रीच्या सुमारास अनुभवायाला मिळालेले सौम्य स्वरूपाचे धक्के भूकंपाचे असल्याचे बोलले जात आहे. रात्री जाणवलेले धक्के काही सेकांदाचे असल्याचे सांगितले जात आहे.
मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के! मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 15, 2025 Rating: 5
Powered by Blogger.