घरकुल लाभार्थ्यांना व शासकीयकामाकरीता रेती उपलब्ध करून देण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : यवतमाळ जिल्ह्यांमध्ये खूप मोठया प्रमाणात रमाई शबरी, आदीम, मोदी आवास व पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्या असून रेती अभावी घरकूल योजनेचे सर्व कामे व ग्राम पंचायत स्तरावरील शासकीय विकासात्मक कामे रखडलेले आहे. यवतमाळ जिल्हा विभागामध्ये १६ तालुके असून प्रत्येक तालुक्यामध्ये २ रेती घाट घरकूल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शासकीय विकासात्मक कामा करीता राखीव देण्यात यावे अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. 

सध्या जिल्ह्यातील रेती घाट बंद असल्याने घरकुल धारकांच्या घरांचे बांधकाम थांबले आहे त्यामुळे ज्या घरकुल धारकांनी जुने पडीक मकान पाडुन नवीन घरकुलांचे बांधकाम सुरू केले त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. कारण तर जुने कसेबसे असलेले पडके घर पाडून नवीन घरकुलाचे काम सुरू केले मात्र तेही रेती अभावी बांधकाम बंद आहे आता त्यांना एकच प्रश्न पडला की जुने घर गेले आणि नवीन घराचे बांधकाम थांबले आता रहायचे तरी कुठे? कारण उन्हाळ्याचे फक्त तिन महिने शिल्लक आहे अशात जर घरकुलांचे बांधकाम झाले नाही तर गोरगरीब घरकुल धारकांची मोठी पंचाईत होईल तसेच ग्राम पंचायत अंतर्गत शासकीय विकासात्मक बांधकामे सुद्धा रेती अभावी रखडले आहे त्यामुळे लवकरात लवकर रेती घाट सुरु करुन प्रत्येक तालुक्यात दोन रेतीघाट घरकुल योजना व ग्राम पंचायत अंतर्गत शासकीय विकासात्मक कामा करीता राखीव देण्यात यावे अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव, उमेश राठोड, प्रमोद नाटकर, नरेश राठोड, प्रिया वारंगे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
घरकुल लाभार्थ्यांना व शासकीयकामाकरीता रेती उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांना व शासकीयकामाकरीता रेती उपलब्ध करून देण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 18, 2025 Rating: 5
Powered by Blogger.