सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : व्याख्यानाच्या दिवशी नेमका व्हॅलेंटाईन डे होता. त्यावर अंधारे म्हणाल्या की, प्रेम फक्त 'तिचं' आणि' 'त्याचं' नसतं ते माय लेकराचंदेखील असतं. संत रविदास यांनी आईचं प्रेम काय असतं ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. हीच संत रविदास महाराजांची शिकवण होती. ते सर्वसामान्य कुटुंबातले होते. तसं पाहता एरवी शिष्याची ओळख त्याच्या गुरुमुळे होते. मात्र संत रविदास महाराजांमुळे त्यांच्या गुरुंना विशेष ओळख मिळाली. असे प्रतिपादन शाहू, फुले, आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे यांनी केले. त्या संत रविदास महाराज जयंती उत्सवातील प्रबोधनाच्या पहिल्या पर्वात बोलत होत्या.
यावेळी किरण देरकर, मीना भागवतकर, सुनिता लांडगे आणि प्रणोती बांगडे, पांढरकवडा येथील रेखा लिपटे, मीना संबा वाघमारे, मीनाक्षी दुबे, वंदना लिपटे या मान्यवर उपस्थित होत्या. ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना समिती आणि संबा वाघमारे परिवाराकडून सुषमा अंधारे यांचा सत्कार झाला.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, खरा ज्ञानी तोच ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे. अन्यथा त्या ज्ञानाला अर्थच नाही.
प्रेमाची हीच भाषा संत रविदास यांच्या लेखणीत उतरते. 15 व्या शतकातले 16 नावांनी ओळखले जाणारे संत रविदास आजही सर्वांच्या काळजात आहेत. श्री संत रविदास महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगितला व अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र बच्चेवार तर आभार भारती दौलत वाघमारे यांनी मानले.
प्रेम फक्त 'तिचं' आणि" त्याचं' नसतं, ते माय लेकराचंदेखील असत - सुषमा अंधारे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 18, 2025
Rating: