सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : मत कोणत्या विचारसरणीला द्यायची हे महत्वाचं असतं. आज संजय रामचंद्र खाडे वणी मतदार संघातील वणी मारेगाव झरी तालुक्यासाठी काय करणार हे आज जाहिर केलं. "विकासासाठी वचननामा" असं त्यांनी नाव दिलय. आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बोलतात एक आणि करतात एक अशी पद्धत आपण पाहत आहोत. जाहिरनामा प्रकाशित होत असतो.. मात्र, संजय खाडेंची एक वचनबद्धत्ता आहे..
शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली जाईल, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार, मतदार संघाची प्रगती अधिक जोमाने करु, अशा घोषणा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी वचननाम्यामध्ये करण्यात आल्या आहेत.
खाडेंच्या वचननाम्यांनी ठळक मुद्दे
• प्रत्येक गावात शेतीच्या विकासासाठी पक्के पांदण रस्ते तयार करणार, पिकाला हमीभाव (कापूसः १२०००/- प्रती विचंटल, सोयाबीन: १००००/- प्रती क्विंटल) मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न करणार शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध करून देणार.
युवक :-
• "युवक तिथे व्यायामशाळा" युवकांसाठी प्रत्येक गावात व्यायाम शाळा बांधणार, वणी, झरी व मारेगाव तालुक्यात क्रीडा संकुले सर्व सोयी सुविधांनी अद्यावत करणार, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
महिला :-
• महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनविणार, महिला कौशल्य विकासावर भर देणार, महिला सुरक्षेवर व शिक्षणावर विशेष लक्ष देणार.
"माझा शब्द" :-
• वेकोली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादित करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, तीनही तालुक्यात MIDC च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार, कायमस्वरूपी चालतं- फिरतं जनहित केंद्र उभारणार.
उद्योग :-
• मोठा दुग्ध उद्योग उभारुन दुग्ध व्यवसायाला चालना देणार, मोठा कापड उद्योग उभारून कापूस पिकाला भाव मिळवून देणार तसेच नवीन रोजगार निर्मिती करणार, महिला स्वयंरोजगारास चालना देणार, MIDC उद्योग विकासाकडे विशेष लक्ष देणार.
शिक्षण :-
• "गाव तिथे अभ्यासिका", प्रत्येक गावात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका बनवणार, नियमित करिअर मार्गदर्शन सत्रे राबवणार, आदिवासी व ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करणार.
पायाभूत सुविधा :-
• प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते करणार, रस्त्याच्या दोन्ही कडेला भूमीगत, हवाबंद गटारे, गावातील प्रत्येक वार्डात सार्वजनिक शौचालय बांधणार, नियमितपणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार.
प्रदूषण मुक्त शहर :-
• वणी ला प्रदूषण मुक्त करणार, तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्गीकरण करणार.
शहरी भागात रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागातील तरुणांचा देखील त्यांच्या गावाजवळ रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही संजय खाडे यांनी म्हटलं.