देवस्थानच्या जमिनी संजय देरकरांनी बळकावल्या : माजी आ. विश्वास नांदेकर यांचा आरोप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थानच्या संपुर्ण जमिनी उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार संजय देरकर यांनी बळकावल्या आहे. असा आरोप माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेतुन केला आहे. याबाबत भक्तांनी संजय देरकर यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन चौकशी करावी अशा आशयाची मागणी करणारी तक्रार पोलीसात केली होती. मात्र, कारवाईला कमालीचा विलंब होत असल्याने त्यांनी पत्रकार परीषद घेऊन प्रकरणाचे दस्ताऐवज माध्यमा कडे सादर केले आहे. झरी तालुक्यातील रुईकोट येथील शेती गट क्रमांक 49/5 ही शेत जमीन जगन्नाथ महाराज देवस्थान वेगांव यांना

कृष्णराव मंदावार यांनी दान दिली होती. ही शेतजमीन ईस्पात कोळसा कंपनीला देवस्थान कमेटीचे सचिव तथा उबाठाचे उमेदवार संजय देरकर यांनी ताब्यात दिली. या शेतजमिनीतुन बी.एस.ईस्पात कंपनीने 50 कोटीच्या वरचा कोळसा विकला आहे. याबाबतची तक्रार सदगुरु जगन्नाथ महाराज भक्त तथा समाजसेवक बंडु देवाळकर यांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. पोलीसांचा ससेमिरा सुरु होताच सचिव देरकर यांनी ही शेतजमीन 17/10/2024 ला कोळसा कंपनीला उधारीत विकत दिली आहे. या व्यवहारात 2025 पर्यंत पोष्ट डेटेडचे चेकचे विवरण दिलेले आहे. या बोगस व्यवहारात संजय देरकर यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप पत्रकार परिषद मधुन करण्यात आला आहे.