टॉप बातम्या

शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये... शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना हरीश ससनकर राज्य सरचिटणीस पुरोगामी शिक्षक समिती यांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ना.दादाजी भुसे हे शैक्षणिक गुणवत्ता आढावा सभेसाठी चंद्रपूर येथे आलेले असतांना त्यांना भेटून अशैक्षणिक कामे व संचमान्यता या विषयांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी दिले.
      
जिल्हा परिषद नगर परिषद शाळेतील शिक्षकांच्या मागे रोज नवनवीन अशैक्षणिक कामे वाढत आहेत त्यामुळे त्यांना शिकवायला वेळ कमी मिळत आहे याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे.
     
रोज च्या रोज शिक्षण तसेच अन्य विभागाच्या लिंक भराव्या लागतात, ऍप डाउनलोड करून फोटो माहिती अपलोड करावी लागते या सर्व अशैक्षणिक कामामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत, त्यात निवडणूक आयोगाने बी.एल.ओ साठी अन्य कर्मचाऱ्यांना सोडून शिक्षकांच्या नेमणुका प्राधान्याने केल्या आहेत त्यात काहींना शाळेच्या गावापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरील बूथ वर मतदार नोंदणी ची कामे दिली आहेत, तसेच एका शाळेतील अनेक शिक्षकांचे नंबर लावल्यामुळे शाळा घ्यायची कशी व शिकवायचे कधी ? हा प्रश्न शिक्षकापुढे निर्माण झाला आहे निवेदनातून हे बी.एल.ओ चे काम काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे.
     
नवीन संचमान्यतेमुळे राज्यातील शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे वर्ग अनेक व शिक्षक एक अशी स्थिती निर्माण झाली आहे यापुढे गरिबांच्या शिक्षणासाठी शासकीय शाळा टिकवायच्या असतील तर नवीन संचमान्यता लागू करण्याचा फेरविचार करण्यात यावा अशी सुद्धा मागणी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंद कुमार शेंडे आदींचा स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनातून शालेय शिक्षण मंत्री यांना करण्यात आली आहे.
Previous Post Next Post