सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टॉकी जवळ आयोजित केली आहे. या स्पर्धेत गट अ- वय 1 ते 3 - 3 थ्रीव्हीलर (Tricykle), गट ब- वय 3 ते 6 - 5 सायकली, गट क- 6 ते 9 - 5 सायकली, गट ङ- वय 9 ते 12 - - 5 सायकली, 3 सायकलींचे लक्की ड्रॉ होणार असून सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी केंद्रीय मंत्री व ओबिसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष उपस्थिती मध्ये होणार आहे.
लाखों बक्षीसांचा पाऊस पडणार असून या स्पर्धेत एकूण सहाशे प्रवेश मर्यादा असून नोंदणी कार्यक्रम स्थळी घेतली जाईल. नोंदणी करिता सागर मुने 9028903511, राजु रिंगोले 9284881655, सौरभ राजुरकर 9657698332 यांच्याशी संपर्क साधावा. विशेष म्हणजे ही स्पर्धा निःशुल्क आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे, आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अॅड. कुणाल विजय चोरडिया भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले आहे.