सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील सावर्ला-नायगाव नजीक महार्गांवर उभा असलेल्या ट्रक दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एक कर्मचारी ठार झाला. हीदि,२१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास घडली.वणी उमेद, वणी पंचायत समिती कार्यालय येथे हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वणी येथे कार्यरत असलेले भास्कर नानाजी कुमरे रा. कोपरी ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील हे कर्मचारी वणी वरून वरोरा दरम्यान प्रवास असताना गुरुवारला रात्री ८ वाजता च्या सुमारास सार्वला-नायगाव जवळ सिमेंट कंटेनरचा ट्रक क्रमांक (MH 34- BG7766) हे वर्दळीच्या मार्गावर उभा असलेला ट्रकला दुचाकीस्वार यांची दुचाकी (MH 29-BB 4449) जोरदार ट्रकला धडकल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना प्रथमोपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले असुन त्यांच्या पश्चात त्यांचे आई, पत्नी व दोन वर्षाची मुलगी, असा आप्त परीवार असुन या भीषण अपघातात मुत्युमुखी पडलेल्या भास्कर नानाजी कुमरे यांच्या निधनाने कुमरे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.