सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदार संघात राजकीय मैदान चांगलेच तापले. यामध्ये महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत चांगली चुरस निर्माण केली. आता त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (ता. 11) नोव्हेंबर ला सकाळी ठीक 11 वाजता शासकीय मैदानावर प्रचार सभा असल्याने ते काय बोलणार याकडे विधानसभेतील मतदारांचे लक्ष लागले आहे.
संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे 'बटेंगे नहीं, तो जितेंगे' ही कार्यकत्यांची जनभावना असल्याने ते आता विधानसभेच्या निवडणूक प्रचारात जोरदार कामाला लागले. त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात प्रचार सुरू केला असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लढतीत आणखी बळ देण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज वणी येथे प्रचार सभा घेणार आहेत त्यांच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण विधासभेचे लक्ष लागले आहे.