सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : 76-वणी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचे काँग्रेस पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले. अशी माहिती पत्र परिषदेतून देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत माजी आमदार वामनराव कासावार, अॅड. देविदास काळे, घनश्याम पावडे, मारोती गौरकार, आशिष खुलसंगे राकेश खुराणा यासह अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
वणी मतदारसंघ महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या उबाठाच्या वाट्याला गेल्यानंतरही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. ही बाब शिस्तभंग करणारी असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्दशावरून काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे यांनी संजय खाडे यांना निलंबित केले.
संजय खाडे हे गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. वणीची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला येईल, ही अपेक्षा होती. मात्र वाटाघाटीत ऐनवेळी ही जागा उबाठा च्या वाट्याला गेली. त्यामुळे संजय खाडे यांनी बंडाचे हत्यार उपसत अपक्ष उमेदवारी दाखल केली. काल शुक्रवारी संध्याकाळी वसंत जिनींग येथील सभागृहात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केली, त्यामध्ये संजय खाडे सह प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस नरेंद्र ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य पुरुषोत्तम आवारी, माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रमोद वासेकर, शंकर वऱ्हाटे, प्रशांत गोहोकार, पलाश बोढे, वंदना आवारी यांनाही निलंबित करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत माध्यमाना सांगितले.
काँग्रेसमधून संजय खाडे याचेसह सात पदाधिकाऱ्यांचे निलंबन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 15, 2024
Rating: