सोनुर्ली येथील हरविलेल्या सहा वर्षीय 'रुद्रा'चा अखेर विहिरीत आढळला मृतदेह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : दिनांक 8/9/2024 रोजी आईवडील शेतात कपाशी निंदत असताना त्यांचा सहा वर्षीय बाळ शेतातून अचानक बेपत्ता झाला. आपला एक मुलगा दिसत नसल्याने त्याचा शोधाशोध घेणे सुरू केले. मात्र, त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने साडेसहा वाजताचे दरम्यान गावातील पोलिस पाटील व वडील संजय बोरेकार यांनी वडकी पोलिस स्टेशनला मुलगा रुद्रा संजय बोरेकार वय 6 यास पळवुन नेल्याची तक्रार दिली होती. त्याच्या हरवल्याची छायाचित्रासह माहिती सोशल माध्यमात वायरल झाली,कुठेही आढळून आल्यास कळवा असे,आवाहन देखील करण्यात आले होते. 

रुद्रा संजय बोरेकार असे हरवलेल्या बालकाचे नाव आहे. हा सहा वर्षाचा मुलगा 8 सप्टेंबर रोजी रविवारी अचानक शेतातून बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार प्राप्त होताच पोलीस प्रशासन तत्काळ टीम तयार करून "रुद्रा" या सहा वर्षाच्या बाळाला शोधमोहीम राबवित असताना त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता, दुसऱ्या दिवशी ठाणेदार व त्यांची टीम पुन्हा शोधाशोध सुरू असतांना आज सोमवार ला सकाळी 9 वाजता च्या दरम्यान सोनुर्ली येथील डॉ. नरेंद्र खैरे यांच्या शेतातील विहिरीत त्या निरागस रुद्राचा मृतदेह आढळला असल्याची माहिती वडकी पोलीस स्टेशन ला मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात तरंगत असलेल्या बाळाचा मृतदेह लगेच बाहेर काढुन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले. पुढील घटनेचा तपास वडकी पोलीस करित आहे. मात्र, या निरागस बाळाचा अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने सोनुर्ली तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

आई-वडिल शेतीच्या कामात होते व्यस्त... स्वराज व रुद्रा हे दोघेही मुलं होते खेळखेळत.
आईवडील शेतात कपाशी निंदन करत होते. रुद्रा संजय बोरेकार व त्यांचा लहान भाऊ स्वराज हे दोघेही सोबतच जवळजवळ खेळत होते. नंतर आईवडील व दोन्ही मुलांसह एकत्र जेवण केले. थोडीशी विश्रांती नंतर आई-वडील निंदायला लागले, अशातच रुद्रा व स्वराज हे दोघेही भाऊ एकत्र शेतातच खेळत होते. पण थोड्या वेळानी स्वराज हा एकटाच आईवडीलांकडे आला, तेव्हा त्याला रुद्रा बद्दल विचारले असता तो काहीच सांगत नसल्याने गहिवरलेल्या आईवडीलांनी त्याला शेतात पाहणी केली असता रुद्रा कुठेच दिसत नसल्याने ६.३० वाजताचे दरम्यान गावातील पोलिस पाटील व रुद्रा चे वडील संजय बोरेकार यांनी वडकी पोलिस स्टेशनला मुलाला पळवुन नेल्याची तक्रार दिली.
Previous Post Next Post