टॉप बातम्या

पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या- वैभव कवरासे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : सोयाबीन पिकावरील पिवळ्या मोझॅक रोगामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी,अशा आशयचे निवेदन आज (ता. 9) ला जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुल्यातील सोयाबिन पिकावरील येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक पिवळे पडून पूर्णपणे कोमेजून चालले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज पर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर केलेला खर्च हा सुद्धा निघेल की, नाही काही सांगता येत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे झालेले नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी,अशी आग्रही मागणी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांच्या नेतृत्वात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात असेही म्हटलं आहे की, शेतकरी आशा बाळगून होता. मात्र,चार ते पाच दिवसात बुरशी सारखा रोग आला आणि पूर्ण सोयाबीन पिक नष्ट झाले. त्यामुळे पिक विम्यात सोयाबीन पिकाला सामावून घेणे व शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी जाहीर केली. मात्र, या यादीमधून काही शेतकऱ्यांचे नाव नसल्याने काही शेतकऱ्यांना अजूनही कर्ज माफीचा लाभ मिळालेला नाही. सदर निवेदनाची दोन ते तीन दिवसात दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय अशी सहकार्याची अपेक्षा व्यक्त युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनाही केली आहे. 

निवेदन देताना माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे, संजय खाडे, गिरीधर आगलावे सरपंच निंबाळा,सचिन उपरे खांदला, महेंद्र देवाळकर पिंपरी, प्रमोद कोसारकर कोरंबी, देवराव भोयर पिंपरी, रविंद्र खामणकर कोरंबी, सुरेंद्र बेलेकर ढाकोरी, अभिनंदन भेंडाळे, सुधाकर गेडाम, विकास गिरसावळे, अनिल बोढाले आदी उपस्थित होते. 
Previous Post Next Post