टॉप बातम्या

विजय चोरडिया वणी विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांच्या भेटीला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
                         
वणी : भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात दौरा सुरू केला असून या दौऱ्यात वणी विधानसभा मतदार संघातील विविध गावात जाऊन गणेश मंडळांना भेटी देत आहे. 

या भेटी दरम्यान, चोरडिया यांनी बाबापुर येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेतले. सोबतच मुकुटबन, झरी, दुर्बा आणि सतपल्ली येथील नवजीवन गणेश मंडळाला भेट दिली. येथील मंडळाच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी भाजपचे विजय चोरडिया यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले व भव्य सत्कार केला. 

ज्या ज्या ठिकाणी विजय चोरडिया यांनी भेटी दिल्या, त्या त्या प्रत्येक मंडळांनी चोरडिया यांचा सन्मान केला. वणी विधानसभा क्षेत्रातील गावा गावात जाऊन गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश दर्शन करणार असल्याचे मानस समाजसेवी विजय चोरडिया यांनी व्यक्त केला. 
Previous Post Next Post