टॉप बातम्या

शिकवणीला गेलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहराच्या सात किमी अंतरावर असलेल्या राजूर (ई.) येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. मुलं अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेने तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे.

अनिरुद्ध अमोल गवळी (17 वर्षे) असे या बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. वणी येथे शिकवणी वर्गाला जाण्याकरिता निघालेला हा अल्पवयीन मुलगा नंतर घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. 

पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम 137 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अल्पवयीन बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.
Previous Post Next Post