राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता ताटके

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वासिम : रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेकजन निवडतात.गॉगल घातलेले एक दोन चार कार्यकर्ते,आलिशान कार, आणि लोकांचा गराडा.अशी भुरड अनेकांना पडते. मात्र राजकारणात अपयश आलं की राजा रंक कसा होतो, तसं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वासिमचे महादेव ताटके. राजकारणापायी कोट्यावधी संपत्तीचा कचरा झाला,आणि ते रस्त्यावर आले. राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता महादेव ताटके (मंगरूळपीर जि.वासिम) 

ज्यांनी कार्यकर्त्यांना मोटारसायकली वाटल्या,ज्यांनी चारचाकी भेट म्हणून दिल्या,ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं,त्याच महादेव ताटकेवर आज उपासमारी ची वेळ आली आहे. 
कुणी पन्नास शंभर रुपये दिले तरी एकवेळ चे पोट भरतं अशी वाईट परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे. वासिम च्या मंगरूळपीरचे महादेव ताटके हे रोजगाराच्या शोधात मुंबई ला गेले.लाखों नाही तर, करोडो रुपये कमवून त्यांनी आपलं नाव मोठं केलं. गरीबीची जाण असणाऱ्या महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि ते मुंबई सोडून परत गावी आले.समाजकारण करताना त्यांना राजकारणाचा विचार आला आणि तिथेच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला.

ताटकेंच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर 2009 साली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांनी निर्णय घेतला.कार्यकर्त्यांना त्यावेळी त्यांनी 75 मोटारसायकली भेट दिल्या.टाटा कंपनी ची 3 चारचाकी वाहनही भेट दिल्या.खत, बी बियाणे, साडया चोळी वाटप केलं.वर्तमान पत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या.मात्र 2009 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

मी आयुष्यात स्वतःचा विचार कधीच केला नाही. लोकांचा, गोरगरीबांचा विचार केला.कारण गरिबी मी जवळून बघितली.कमीतकमी त्यावेळी माझे निवडणुकीत दोन करोड रुपये गेले.सामाजिक कार्य करताना दोन करोडो रुपये खर्च झाले.आहो त्यावेळी माझ्याकडे करोड रुपये होते साहेब, आता दहा रुपये सुद्धा नाही. अशी परिस्थिती आली आहे, मुंबई च घर, ऑफिस सगळं विकून टाकलं, आता इथलं पण घर विकायची पाळी आली, माझ्यावर लोकांचं कर्ज आहे.
-महादेव ताटके

राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटकेंना हातचा पैसा गमवावा लागला.

दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महादेव ताटकेची ओळख मात्र,राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला,हातचे सगळे पैसे संपले,कार्यकर्ते दुरावले,ज्यावेळी त्यांना मदतीची गरज होती, त्यावेळी त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. 

त्यावेळेस भरपूर पैसा होता,त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला जबरदस्त गर्दी राहायची.जसाजसा पैसा कामी झाला तसेतसे लोकं त्यांना सोडत गेले.आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की, त्यांना त्यांच घर चालवणे ही कठीण आहे.
-नागरिक 
कालपर्यंत ज्यांनी मदतीचा हात इतरांना दिला,ते आता मदतीची आस लावून बसले आहे.ज्यांनी माणुसकी चा धर्म पाळला,माणुसकी चा धागा विनला त्याच ताटकेंना,माणुसकीचं दर्शन घडणार का?,ताटकेंच्या मदतीसाठी पुढे कोणी येणार का? असाच प्रश्न ताटकेंच्या नजरेतून दिसतोय. आपल्या मतदार संघातील लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्यासाठी ज्यांनी लाखों करोडो चा खर्च केला त्याच्यावर अणवानी चालण्याची वेळ आली आहे.
एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके, आतामात्र ऐकाकी पडले आहे.एकेकाळी इस्त्रीचे कडक कपडे घालून फिरणारे ताटकेंवर फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे.त्याला कारण ठरलीय ती राजकारणाची वाट.ही वाट धरली नसती तर कदाचित तटकेंचे दिवस काही वेगळे असते.
आता ते म्हणतात की, तरुणांनी राजकारणात पडू नये, राजकारण करा, पण व्यवसाय सोडून करू नका. राजकारणात काही पडलं नाही. तुमच्यासमोर ताज उदाहरण आहे मी. माझी कळवडीची विनंती आहे की आधी शिक्षण घ्या, व्यवसाय, घर सांभाळा ही सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे.







राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता ताटके राजकारणाच्या नादात संपूर्ण अस्तित्व गमावून बसलेले सामाजिक कार्यकर्ता ताटके Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.