सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी मतदारसंघ हा पंचरगी मतदार संघ म्हणून ओळखला जातो.याच मतदार संघात निवडणूकीचा सामना अटीतटीचा रंगताना आगामी विधानसभेच्या अनुषंगाने पाहायलाही मिळतो. जर मागील काळ बघितला तर माजी आमदार वामनराव कासावार यांनी वणी या मतदारसंघांमध्ये मागील २० वर्षाची सत्ता भोगली आहे. तसेच याच विधानसभेत मागील बऱ्याच वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक काम करत आहे. कासावार नंतर नांदेकर हे आमदार झाले आणि या वणी मतदार संघाचे चित्र आणखीनच बदलले. मात्र,यादरम्यान सेनेचा मित्र पक्ष भाजपने कासवाच्या चालीने जनसंपर्क वाढवत २०१४ पासून सत्ता काबीज केली आणि दहा वर्ष काँग्रेस आणि शिवसेना सत्तेपासून दूर लोटली गेली. राज्यात पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेबाचा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दृढ विश्वास ठेवत वणी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक गटबाजीला झूगारून आपापल्यापरीने आजही कार्य करत आहे. जिल्हाप्रमुखांनी पक्षांमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले असून, त्यांच्या पंचवार्षिक काळामध्ये त्यांचे कार्य तर अतुलनीय आहेत त्यांनी मतदार संघातील अवैध धंदे प्रथम बंद केली, जे आजतागायत कोणी करू शकलं नाहीत. तसेच गावोगावी शाखा उघडल्या आहे. गावोगावी, खेडोपाडी जाऊन अनेक उपक्रम राबविली आहे. त्यामुळे त्यांचं वलय अजूनही असल्याचे बोलल्या जाते. मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची उमेदवारी मिळाल्यास जनसामान्यांची सेवा करण्यासाठी आता अनेक जन दावेदार उभे ठाकले असल्याचं आता चित्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या तोंडावर ग्रामिण भागात दावेदार उमेदवारांनी भेटी चालू केल्या असून, विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागले आहे. मात्र, होऊ घातलेल्या वणी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे मतदारांचे लक्ष लागले असताना शिवसेना (उबाठा) कडे वणी विधानसभेची शीट गेल्याची बातमी वायरल झाली असल्याने अनेकांना धक्का बसला तर, नव्याने आमदार होऊ पाहणाऱ्यांचे स्वप्नभंग होणार का?,असे तूर्तास बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्यांनी स्वतंत्र दावा केला त्यांना तर मोठा धक्कातंत्र असल्याचे चर्चा आता रंगत आहे. मात्र, महाविकास आघाडी असल्याने कोणाचं काहीही चालणार नाहीत. आघाडी नाहीतर बिघाडी. तूर्तास यवतमाळ जिल्ह्यात चार काँग्रेस, एक राष्ट्रवादी (शपागट) तर दोन शिवसेना (उबाठा) असा फार्मुला ऐकीवात असल्याने उद्धव सेनेमधून कोणाच्या गळ्यात माळ पडणार ही चर्चा आता जनतेतून होऊ लागली आहे. वणी मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे वातावरण गरम असल्याने नांदेकर, देरकर, निखाडे की, कातकडे अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव सेनेत दोन गटबाजी, यातूनच फोर्थलाईन मार्ग निघू शकते असेही आता चर्चील्या जात आहे.
वणी विधानसभेची उमेदवारी कोणाच्या पत्यावर; कार्यकर्त्यांचा मुक्काम पोस्ट शिगेला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2024
Rating: