सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : करणवाडी ते खैरी या मार्गावरील महादापेठ परिसरातील खड्ड्यांनी वाहनधारकांच्या नाकीनऊ आणले आहेत. हा मार्ग उपविभागाने येथे केलेल्या थातुरमातूर उपाययोजनेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. यामुळे येथील खडड्यांनी आपले डोकं वर काढण्यास सुरवात केली आहे. या खड्ड्याने अपघाताची शक्यता बळावली असून स्थानिकही प्रचंड हैराण झाले आहेत.
या मार्गाने वाहतूक बोटावर मोजण्याइतकी आहे. तरीही एवढी बिकट अवस्था अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून वाहने, दुचाकीवरून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. महादापेठ कुंभा या रस्त्यावर एवढा भयावह गड्डा असूनही संबंधितांना दिसत कसा नाही असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च?
महादापेठ ते कुंभा रस्ता असो की तालुक्यातील रस्ते ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही मात्र अलीकडच्या काही दिवसात या मार्गावर जीवघेणे खड्डे पडलेत, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा आहे.
-विजय बोथले
उपाध्यक्ष : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव
महादापेठ रस्त्यावर जीवघेणे खड्डे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2024
Rating: