सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
राळेगाव : भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली.
शिर्डी येथील हाॅटेल साईगोल्ड इन मध्ये दिनांक २९/९/२४ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती देण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्हा भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पत्रकार, तसेच विविध बहुउद्देशीय संघाचे प्रतिनिधि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनोद माहुरे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच "सह्याद्री चौफेर" ई न्यूज परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा...
यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2024
Rating: