टॉप बातम्या

जगन्नाथ महाराजांचे भक्त ह.भ.प.कवडुजी महाराज तिखट यांना देवाज्ञा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वेगांव येथील धार्मिक उत्सवात सदा सर्वदा सक्रिय असणारे, भागवत सप्ताह तसेच वेगावहून निघणारी पारंपरिक पंढरपूर दिंडी मधे त्यांचा मोलाचा वाटा असायचा. त्यांच्या योगदानामुळे वेगांव भक्तजनांची त्यांच्यावर अपार श्रद्धा होती. मृदुभाषी आणि सर्वांशी भावनिकता असा त्यांचा स्वभाव होता.       
काही दिवसापासून त्यांना निमोनिया ह्या आजाराने ग्रासले होते. त्यातच त्यांना आज ता.१७ रोज मंगळवार ला देवाज्ञा झाली.
त्यांच्या निधनाने भक्तजनात शोककळा पसरली. मृत्यूसमई त्यांचे वय अंदाजे ६० वर्ष होते. त्यांच्या पशच्यात पत्नी, एक मुलगा व दोन मुली व बराच मोठा भक्तपरिवार आहे.
Previous Post Next Post