जीवेत शरद शतम्
अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी सौ.संध्याताई बोबडे या आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी महिला जिल्हाध्यक्ष पदावर विराजमान झाल्यापासून खासदारकीची निवडणूक त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील महिला संघटन वर भर देवून महिलांना एकत्रित आणणे, मणिपूर, कलकत्ता, बदलापूर अत्याचाराच्या विरोधात आंदोलन, शेतकरी न्याय यात्रेत सहभाग, आदीवासी मुलींच्या वसतीगृहाला भेट. विशेष म्हणजे नारी न्याय हक्कासाठी दिल्लीतील आंदोलनात त्यांचा प्रामुख्याने सहभाग राहिला आहे.
त्या अगोदर त्यांनी ता. अध्यक्षपदी असताना महिलांचे मेळावे, सवित्रीबाई फुले, मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, रमाई, इंदीरा गांधी यांची जयती साजरी. ग्रामपंचायत ला सदस्य असतांना कल्चरल प्रोग्राम, शालेय विद्यार्थाना ड्रेस, बुक पेन स्वखर्चातुन पाच वर्ष दिली. गरजु महिलांचे ऑपरेशन असो की, डब्लू सी एल (wcl) चे कार्यक्रम असो त्या नेहमी सक्रिय राहिल्या, विशेष उल्लेखनीय की,नागपूर येथील आंदोलनात असंख्य महिलांना घेऊन हिररीने मोठा सहभाग राहीला आहे. वणी तालुक्यातील नायगाव (बु.) येथील आजोबा उद्धवजी बोबडे व पती अरविंदजी बोबडे यांच्या प्रेरणेने त्या राजकारणात सक्रीय झाल्या.
प्रसिद्धी च्या कोसोदूर असलेल्या अभिष्टचिंतन...या औचित्याने "नारी न्याय" व "खर्चे पे चर्चा" आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच महिला काँग्रेस ची सदस्य नोंदणी अशा अनेक विविध सुबक संकल्पना घेऊन सर्व तालुक्यात उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.
खरंतर..शालेय जीवनापासुनच त्या विविध सामाजिक संघटना आणि चळवळीशी सक्रिय जुळलेल्या असल्यामुळे सामान्य महिला व नागरिकांना त्या अतिशय संयमी, शांत व मृदू स्वभाव अशी त्यांची ओळख आहे. गावापासून ते शहरापर्यंतचा त्यांचा 32 वर्षाचा काँग्रेसशी एकनिष्ठ प्रवास हा फक्त आणि फक्त काँग्रेसची विचारधारा व त्यातून ग्रामीण विकास कशा साधता येइल आणि त्यासाठीच नेहमी काम करणे हाच मुख्य उद्देश असल्याचं अधोरेखित होते. काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी काँग्रेस ला बळकट करण्यासाठी आणखीनच विशेषतः महिलांना एकत्रित करत चळवळ सुरु केली.
सौ.संध्याताई बोबडे यांच्या दूरदृष्टीचा परिचय एवढ्यावरच थांबत नाही तर, त्यांनी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तीनदा तालुका अध्यक्ष,रोजगार हमी योजनेच्या मेंबर (EGS), अशा अनेक विविध पदे भूषविली आहेत आणि भुषवीत आहे. पुढेही त्या गोरगरीब, सर्वसामान्य, शेतकरी-शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व महिलांवरील अन्याय अत्याचार यासाठी भरीव कार्य करो... यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.. हिच निर्मिकाकडे प्रार्थना.
ताई या जन्मदिनी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
💐शुभेच्छुक :
• संध्याताई बोबडे मित्र परिवार, वणी विधानसभा क्षेत्र
• अरविंद बोबडे मित्र परिवार, वणी विधानसभा क्षेत्र