टॉप बातम्या

सेक्रेटरी कुणाल चौधरींच्या धडाकेबाज भाषणाने यवतमाळ काँग्रेस कमिटी झाली चार्जिंग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : श्रीमान कुणाल चौधरी सेक्रेटरी काँग्रेस कमिटी (AICC) यांनी आपल्या धडाकेबाज भाषणातून यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते, मंत्री, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार्जिंग करत उपस्थितांशी संवाद साधला. आज (ता. 14) यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, विधानसभा क्षेत्र निहाय आढावा बैठक, यवतमाळ येथे पार पडली. 
या बैठकीनंतर उमेदवारीबाबत एकूण सात विधानसभा क्षेत्र निहाय चर्चा झाली. सेक्रेटरी कुणाल चौधरी यांचे जिल्हाध्यक्ष कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करून स्वागत केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात जोश भरण्यात आला. दरम्यान,किसान के पुकार का...राहुल गांधी...राहुल गांधी,जवान के पुकार का... राहुल गांधी... राहुल गांधी... गरीब के पुकार का... राहुल गांधी...राहुल गांधी, अशा दनाणून सोडणाऱ्या जयघोष करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाले.

दरम्यान,आढावा बैठकीच्या निमित्ताने भाजपावर जोरदार निशाणा साधत महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अन्याय,अत्याचार, समाजा समाजात तेढ, भ्रष्टाचार याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आणायचं असेल तर सर्व विधानसभेतून तन मन धन लावून सर्व उमेदवार निवडून आणायचे आहे, पक्ष जो आपल्याला उमेदवार देईल त्याला निवडून आणायचं असून त्यासाठी आतापासून सर्व जाती धर्मातील लोकांपर्यंत जा आणि त्यांना सांगा की काँग्रेस ला सत्तेत आणायचं आहे. पुढे असेही ते म्हणाले की,देशात मोठा बदल होणार आहे. अच्छे दिन वाले घरी बसणार आहे. आपले नेते राहुल गांधी शेतकऱ्यांसाठी, शेतमजूरासाठी, सुशिक्षित बेरोजगारासाठी, कर्मचाऱ्यांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या जवानासाठी या जुलमी सरकार च्या विरोधात लढा देण्याचे काम ते करत आहे. फक्त आपल्याला त्यांच्या या लढ्यात एकजुटीने व पूर्ण ताकदीने उभे राहायचं आहे. काँग्रेस ला सतेत बसवण अत्यंत गरजेचे आहे, म्हणून आजपासूनच कामाला लागा असे, आवाहन पुन्हा त्यांनी यावेळी केले. या आढावा बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नेते, आजी माजी मंत्री, पुढारी, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

Previous Post Next Post