सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील स्वामीनी प्रशांत कुचनकर इयत्ता आठवी डी. ए. वी. पब्लिक स्कूल सुंदरनगर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला 2024 चा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
स्वामीनी नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या काळात तिने विविध प्रकारच्या व्यासपिठावरून ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श समोर ठेऊन तिने अनेक ठिकाणी वक्तृत्व सादर केलेले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने विविध व्यासपीठावरून प्रकाश टाकण्याच्या अल्पसा प्रयत्न केलेला आहेत.
स्वामीनी हिने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भापोसे संदीप पाटील, प्रकाश पोहरे, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे अश्या अनेक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्वाच्या मुलाखती घेतल्या आहे. त्याचसोबत स्वामीनीने सुंदर स्केच सुद्धा रेखाटन करण्याचा छंद जोपासला आहेत.