सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पाटणबोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे दुःखद निधन दिनांक १३ सप्टेंबर २४ ला नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान वयाचा ७२ व्या वर्षी झाले.
६ दशके ते कष्टकरी जनतेसाठी सातत्याने संघर्षमय जीवन जगले. विद्यार्थी दशेपासून त्यांनी संघर्षाला सुरुवात केली. शेवटचा घटके पर्यंत ते समाजवादी भारताचे स्वप्न उराशी बाळगून झटत राहिले. परंतु मृत्यू झाल्यास माझे शरीर जाळून भस्म करण्यापेक्षा अभ्यासासाठी देण्यात यावे असे घोषित केले होते आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी ही पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सुद्धा आपले अवयव व शरीर अभ्यासासाठी देहदान केले होते. यावरून हे सिद्ध होते की खरा कम्युनिस्ट हा जिवंतपणी व मृत्यूनंतरही जनतेसाठी जगत असतो., असे प्रतिपादन दिनांक १४ सप्टेंबर २४ रोजी पाटणबोरी येथील आदिवासी भवनात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत केले.
या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष अय्या आत्राम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सचिव अॅड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर सिडाम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव टेकाम, कवडू चांदेकर हे होते. या श्रद्धांजली सभेला केळापूर व झरी तालुक्यातील अनेक गावातील स्त्री पुरुष उपस्थित होते.