टॉप बातम्या

जेसीबीने अवैध मुरूम उत्खनन करणातांना महसूल विभागाने टाकली धाड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वागदरा (नविन) येथील नैसर्गिक टेकड्यावर डल्ला मारत मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्या ठिकाणी धाड टाकत जेसीबी जप्त केली. या कारवाई ने तस्करात चांगलीच धडकी भरली आहे.

वणी विभागात अवैधरित्या खोदकामाचा सपाटाच लावण्यात आल्याने नैसर्गिक साधनसंपत्ती सह नैसर्गिक टेकड्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेटच परिसरात सज्ज असल्याचे या कारवाईने उघड झाल्याचे दिसून येत आहे. या धडक कारवाईने तालुक्यात चर्चा चांगलीच रंगली.

मुरुम उत्खननांचा हा गोरखधंदा मागील काही महिन्यांपासून वागदरा परिसरात रामघाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील नैसर्गिक टेकड्या पोखरून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात होते. 13 सप्टेंबर ला सायंकाळी महसूल अधिकाऱ्यांनी मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी धाड टाकून मुरुमाचे अवैध उत्खनन करणारी जेसीबी जप्त केली आहे. 


Previous Post Next Post